महाराष्ट्र राज्य
राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दुर्बल घटकांकरिता बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या मोजणी फ़ी मध्ये ५०% सवलत बाबत माहिती

राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम

भूमि अभिलेख खात्याचे खाते प्रमुख जमाबंदी आयुक्त आणि संचालक ,भूमि अभिलेख महाराष्ट्र हे असून त्यांचे मुख्यालय पुणे येथे आहे.यांचे अधिनस्त उप संचालक भूमि अभिलेख पुणे, कोकण (मुंबई),नाशिक,औरंगाबाद,अमरावती व नागपुर असे सहा प्रादेशिक प्रमुख आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र महसुल विभागा सारखे आहे. उपसंचालक भूमि अभिलेख यांचे अधिनस्त प्रत्येकजिल्हयाचे ठिकाणी जिल्हाअधीक्षक भूमि अभिलेख यांची कार्यालये आहेत. जिल्हाअधीक्षक भूमि अभिलेख यांचे अधिनस्त प्रत्येक तालुक्यास उपअधीक्षक भूमि अभिलेख यांची कार्यालये आहेत. शिवाय नगर भूमापनाचे कामासाठी राज्यात एकुण ३० कार्यालये आहेत.या अज्ञावलीमधुन मोजणी साठी प्राप्त झालेल्या अर्जांचे क्रमानुसार मोजणीची प्रकरणे भुकरमापकास मोजणीसाठी दिली जातात

Notice
नविन ई-मोजणी प्रणालीमध्ये मराठी टाइपिंगसाठी ISM सॉफ्टवेअरचा वापर करणे अनिवार्य आहे. सदरचे सॉफ्टवेअर आपणास लोगइन केल्यानंतर मार्गदर्शिका खंड या पर्यायामध्ये उपलब्ध आहे. याची कृपया नोंद घ्यावी.